बेकायेशीररित्या पिस्तूल स्वतःजवळ बाळगून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.गावठी बनावटीच्या पिस्तुलासह, तीन काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
प्रतिनिधी
पुणे –कमरेला संशयीतरित्या पिस्तुल लावून बोपदेव घाटात थांबलेल्या एकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.प्रसाद उर्फ सोन्या मारूती साबळे (20, रा. चिखली, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.Illegal pistol weapon seize by kondhva police in Bopdev ghat
गुन्हे रोखण्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलिस ठाण्याचे कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोलिंग करत असताना बोपदेव घाटात एकजण कमरेला पिस्तूल लावून थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व तुषार आल्हाट यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने सापळा रचला.
बोपदेव घाटातील टेबल स्पॉटवर एक लाल रंगाचा चेक्स डिझाईनचा शर्ट घातलेला, केस वाढविलेला तरूण त्यांना कमरेला पिस्तुल लावलेला दिसला. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिस निरीक्षक गोकुळ राऊत, जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, असगरअली सय्यद, योगेश कुंभार, अमोल हिरवे, दिपक जडे, अभिजीत रत्नपारखी यांनी ही कारवाई केली. प्रसाद साबळेवर वाकड पोलिस ठाण्यात यापूर्वी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. जवळ असलेल्या पिस्तुलातून त्याचा काही घातपात करण्याचा कट होता का ? त्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक एस सुरवसे तपास करीत आहेत.
Illegal pistol weapon seize by kondhva police in Bopdev ghat
महत्त्वाच्या बातम्या
- उद्योगपतीने बायकोसोबत झोपायला सांगितले तहसीन पूनावाला यांचे खळबळजनक वक्तव्य
- Maharashtra Assembly Session : राज्य सहकारी बँकेला 380 कोटींचा नफा; फडणवीस सरकारचेही यात योगदान; अजितदादांकडून विधानसभेत स्तुती!!
- The Kashmir Files : काश्मीरमध्ये 399 हिंदू मेले, तर मुसलमान 15000 मेले; केरळ काँग्रेसचे ट्विट; ट्रोलनंतर मात्र डिलीट!!
- The Kashmir Files : खोटे “हाऊसफुल्ल” बोर्ड लावून गोवा, भिवंडीत धर्मांधांचा “फिल्म जिहाद”…!!