• Download App
    अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक । Illegal money laundering case one accused arrested by Pune police crime branch unit two

    अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक

    अवैधरित्या सावकारी करीत महिन्याला तब्बल १० टक्के दराने व्याजवसुली करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. Illegal money laundering case one accused arrested by Pune police crime branch unit two


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अवैधरित्या सावकारी करीत महिन्याला तब्बल १० टक्के दराने व्याजवसुली करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. त्याच्याकडून कर्जदारांच्या सहीचे धनादेश, कोरे स्टॅम्पपेपर जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायद्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत बाबू लालजी उणेचा( वय ३६ रा.अपर इंदिरानगर, बिबवेवाडी,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.



    नागरिकांना तब्बल १० टक्के व्याज दराने कर्ज देवून त्यांच्याकडून अवैधरित्या वसुली करणाऱ्या सावकाराची माहिती युनीट दोनला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कपडे विक्रीचा व्यवसाय करीत सावकारी करणाऱ्या भरत उणेचा याला ताब्यात घेतले. कर्जदाराकडुन मुद्दल व्याजासहीत वसूल करुन तो कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही उघडकीस आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, मोहसिन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, निखिल जाधव, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांनी केली.

    Illegal money laundering case one accused arrested by Pune police crime branch unit two

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस