विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते आणि प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो? असा सवाल उच्च न्यायालयाने अभिनेत्री आणि अश्लिल चित्रपट प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा याची पत्नी शिल्पा शेट्टीला केली आहे.If you are living a public life, people are interested in the news about you, the court said on Shilpa Shetty’s petition.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने माध्यमांविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्याच्या वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. ‘शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. आमच्याबद्दल चांगलं बोलणार नसाल तर काही बोलूच नका असं मीडियाला सांगण्यासारखं आहे,’ असं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नोंदवलं.
पॉर्न फिल्म प्रकरणात सध्या कोठडीत असलेला राज कुंद्रा यांच्याशी संबंधात अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. सोशल मीडियातही त्यावर चर्चा होत आहे. राज कुंद्रा याची पत्नी असल्याने शिल्पा शेट्टी हिच्याही नावाची चर्चा आहे. राज कुंद्राच्या प्रकरणात शिल्पाच्या सहभागाविषयी देखील काही माध्यमांनी संशय व्यक्त केला होता.
यामुळे शिल्पा शेट्टीने २९ माध्यमांविरोधात विरोधात दावा दाखल केला होता. राज कुंद्रा प्रकरणातील चौकशीविषयी माझ्याविरोधात बदनामीकारक बातम्या दिल्या जात असून माझी प्रतिमा मलीन केली जात आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना त्याविषयीच्या वार्तांकनाला मनाई करावी आणि संबंधित माध्यमांना भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती शिल्पा शेट्टी हिने केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
याबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून आहेत. त्याला आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो? हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असं सांगण्यासारखं आहे.
शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते आणि प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?
‘तुमच्या घरातील खासगी आयुष्याविषयी काही वार्तांकन झालं आणि ते बदनामीकारक असेल तर समजू शकतो. मात्र, तुम्ही सार्वजनिकरीत्या, तुमच्या घराबाहेर काही कृत्य केलं असेल तर त्याचं वार्तांकन प्रसारमाध्यमे करू शकत नाहीत, असं म्हणता येणार नाही.
तुमच्या विनंतीवरून वार्तांकनावर बंदी घातल्यास प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर त्यांचा मोठा परिणाम होईल, असेही न्यायालयानं नमूद केलं. ‘बदनामी झाल्याची ठोस उदाहरणे तुम्ही दाखवा, तर त्याविषयी अधिक सुनावणी घेता येईल, असेही न्यायालयानं स्पष्ट केले आणि सुनावणी तहकूब केली.
If you are living a public life, people are interested in the news about you, the court said on Shilpa Shetty’s petition.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट
- अतिवृष्टीमुळे राज्यात रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; गडकरींशी चर्चा; अशोक चव्हाण यांची माहिती
- अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुख यांना ED चे नवे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
- GREAT NEWS : ऑस्ट्रेलिया सांस्कृतिकदृष्ट्या 14 महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करणार ; यापैकी 13 भारतातून लूटलेल्या