उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात एकत्रच प्रवेश केला, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात एकत्रच प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे. प्रवेशद्वारापासून फडणवीस आणि ठाकरे हे सोबत विधिमंडळात गेले, यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विधिमंडळात सोबत जाताना या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य दिसत होते, यामुळे अनेकजण विविध तर्क लढवत आहेत. if we ever have a meeting behind closed doors, we will surely let you know Former Maharashtra CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Meet
उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘’प्रत्येक भेट हेतूने होत नाही. विधानसभेत प्रवेश करताना माझा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद हा केवळ शुभेच्छांची देवाणघेवाण होता आणि फार काही नाही. असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. याशिवाय, ‘’पूर्वी (राजकीय) वातावरण अधिक मोकळे होते, आजकाल बंद दाराआड होणाऱ्या चर्चा अधिक फलदायी ठरतात असे म्हटलं जातं. त्यामुळे आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू.’’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात चलबिचल आहे, असं महाविकास आघाडीचं नेते म्हणतात, याबद्दल विचारलं असता मंत्री शंभूराज देसाईंनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, “आमच्या लोकांतील चालण्यात, बोलण्यात कुठं जाणवतं का? आम्ही नेहमीप्रमाणे अधिवेशनाचं आणि दिलेल्या विभागाचं काम करत आहे. चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षात नाही. उलट सरकार पडेल म्हणून महाविकास आघाडी तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलं नाही. कारण, फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे.”
If we ever have a meeting behind closed doors we will surely let you know Former Maharashtra CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Meet
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!