विशेष प्रतिनिधी
मुबंई : जागतिक पातळीवर लसीकरण ऑलिम्पिक असती तर भारताने नक्कीच विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले असते अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देशातील लसीकरण कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.If there was vaccination Olympics we would have won a gold medal with a world record, says Anand Mahindra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आला. करोनावरील लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देऊन एक विक्रम प्रस्थापित केला आहे. को-विन पोर्टलवर आकडेवारी उपलब्ध करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत एकूण ७९.२५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे.
महिंद्रा यांनी को-विन पोर्टलवरील या आकड्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला असे लक्षात आले आहे की आपण दर तीन दिवसांनी एका संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतके लसीकरण करत आहोत. शुक्रवारी तर आपण एका दिवसात ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येइतके लसीकरण केले आहे. जर लसीकरण ऑलिम्पिक असती तर विश्वविक्रमासह आपण नक्कीच सुवर्णपदक जिंकले असते.
लसीकरण मोहीमेत शुक्रवारी २.५० कोटी डोस देण्यात यश आलं. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट केलं. ‘भारताचे अभिनंदन, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, भारताने आज इतिहास रचला आहे. २.५० कोटीहून अधिक लसीचे डोस देऊन, देश आणि जगाच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे. आजचा दिवस हा आरोग्य कर्मचाºयांच्या नावे राहिला.
देशात कर्नाटकने सर्वाधिक २६.९ लाख लसीचे डोस दिले, तर बिहारने २६.६ लाखांपेक्षा जास्त डोस दिले. त्याच वेळी, उत्तर प्रदेशात २४.८ लाखांहून अधिक डोस दिले गेले. मध्य प्रदेशात २३.७ लाखांपेक्षा जास्त डोस आणि गुजरातमध्ये २०.४ लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले.
भारताला लसीकरणात १० कोटींचा आकडा गाठण्यासाठी ८५ दिवस लागले. यानंतर ४५ दिवसांत २० कोटी डोस दिले. यानंतर २९ दिवसांत ३० कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा गाठला. ३० कोटीहून ४० कोटीचा टप्पा गाठण्यात २४ दिवस लागले आणि यानंतर २० दिवसांत ६ आॅगस्टला लसीचे ५० कोटी डोस देण्याचा टप्पा ओलांडला. याच्या १९ दिवसांत ६० कोटींचा टप्पा ओलांडला. यानंतर १३ सप्टेंबरला ७५ कोटी कोटींच्या लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले गेले.
If there was vaccination Olympics we would have won a gold medal with a world record, says Anand Mahindra
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे विभागामध्येही होणार मोठ्या सुधारणा, कॅबीनेट सचिवालयाने दिला अहवाल
- देशात अडीच कोटी कोरोना लसीचे डोस दिल्यावर एका राजकीय पक्षाला त्रास सुरू, त्यांचा ताप वाढला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉँग्रेसवर टीका
- चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा
- देशाच्या न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण व्हावे, सध्याच्या वसाहतकालीन नियमांनी भारतीयांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, सरन्यायाधीश रमणा यांचे आवाहन