बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या महिलेचाही आज कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार महिन्याच्या बालकासह माता-पित्यांचाही मृत्यू झाला आहे.If there is any shame left in Aditya Thackeray, he should resign immediately – Nitesh Rane
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वरळीत गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या महिलेचाही आज कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार महिन्याच्या बालकासह माता-पित्यांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान या कुटुंबातील विष्णू पुरी पाच वर्षीय मुलावर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले.
घटना नेमकी काय घडली
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बीडीडी चाळीतील एका घरात सिलिंडर स्फोट झाला होता.या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते.दरम्यान या जखमींना सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु या नायर रुग्णालयात स्फोटात झालेल्या जखमींना ताबडतोब उपचार मिळाला नाही.जखमींकडे दुर्लक्ष करण्यात आले.दरम्यान यांना उपचार मिळत नसल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पालिकेने एक डॉक्टर, एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित केले. या प्रकरणात पालिकेने चौकशी समितीही नियुक्त केली आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बालकाचा एक डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ डिसेंबरला २७ वर्षीय आनंद पुरी यांचा मृत्यू झाला होता, तर आज २५ वर्षीय विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. त्या या स्फोटात ५० ते ६० टक्के भाजल्या होत्या.दरम्यान या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा वाचला असून त्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
If there is any shame left in Aditya Thackeray, he should resign immediately – Nitesh Rane
महत्त्वाच्या बातम्या
- KASHI : १३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …
- RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात