प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकारची हिंमत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्राचे शिंदे – फडणवीस सरकारला दिले. If there is a threat, give Bharat Ratna to Savarkar
छत्रपती संभाजीलगरातील वज्रमुठ सभेत त्याने दोन्ही सरकारांवर जोरदार शरसंधान साधले. धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या, असे म्हणतानाच सावरकरांबद्दल बोलताच यात्रा काढली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केले तेव्हा का मुग गिळून गप्प बसलात?, असा सवाल अजितदादांनी केला.
अजित पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केले की महाराष्ट्र सरकार हे नपूंसक सरकार आहे. राज्य सरकारला जनाची नाही तर मनाची काही लाज वाटली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
भाजपला आव्हान
अजित पवार म्हणाले की, भाजप – शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्ये केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का??, असा सवाल अजित पवार यांनी केला.
मराठवाड्यासाठी वेळ नाही
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सर्वच निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील. प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव दिले, ते बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबान चिन्हासह महाराष्ट्रभर पोहचविले. कायद्याचा आणि घटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांला तिलांजली देण्याचे काम केले. आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. असे जर सर्व राज्यात घडले तर देशात स्थिरता येणार नाही असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मराठवाड्यातील जनतेचा अपमान केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे वेळ दिला. ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढयात नेतृत्व केले असतील त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. मात्र, राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही, असा आरोप त्यांनी केला.
If there is a threat, give Bharat Ratna to Savarkar
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा