एमआयएम’नेही वादात उडी घेतली आहे तर नामफलक बदलण्यासाठी सक्ती करू नये, असे मत व्यापारी संघटनेने मांडले आहे.If the government loves Marathi so much then all shop signs should be replaced at government expense – MP Imtiaz
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान यावरून शिवसेना-मनसे यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असताना ‘एमआयएम’नेही वादात उडी घेतली आहे तर नामफलक बदलण्यासाठी सक्ती करू नये, असे मत व्यापारी संघटनेने मांडले आहे.
दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्राची भाषा ही देवनागरीतील मराठी आहे. त्यामुळे देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशारा दिला.
यानंतर आता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर सरकारला टोकले आहे.”सरकारचे मराठीवर इतके प्रेम आहे तर त्यांनी सर्व दुकानांच्या पाट्या सरकारी खर्चातून बदलाव्यात.
जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी फलक, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता आदींबद्दल बोलतात, असे का होते? ढोंगीपणा न समजण्याएवढे लोक मूर्ख नाही,” असे ते म्हणाले.
If the government loves Marathi so much then all shop signs should be replaced at government expense – MP Imtiaz
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधून वाढविणार स्टार्ट अपची उमेद, आझादी का अमृत महोत्सवानिमित्त इनोव्हेशन इकोसिस्टम कार्यक्रम
- मोदी सरकारची विद्यार्थ्यांसाठी सुविधा, स्कॉलरशिप, फेलोशिपच्या सगळ्या योजना आणणार एका प्लॅटफॉर्मवर
- रेल्वे भरती परीक्षेचा आज निकाल, दीड लाख पदांवरील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
- राहूल गांधींच्या ट्विटचा हवाला देऊन पाकिस्तानकडून भारताची बदनामी, द वायरच्या मुलाखतींचा संदर्भ देऊन कोरोनाच्या मृत्यू संख्येवर केले होते प्रश्नचिन्ह