विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा समाजाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर मराठा समाज गप्प बसणार नाही. मराठा समाजाचे मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. अजूनही ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. मी शांत बसलो आहे पण वेळप्रसंगी यावर बोलेन असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.If the government does not take a decision, the Maratha community will not remain silent, Chhatrapati Sambhaji Raje warned
संभाजीराजे म्हणाले, सगळ्या मराठ्या समाजाच्या संघटनांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा सरकारला अनेकवेळा सांगितले आहे की, आरक्षण हा वेगळा टप्पा आहे ते लगेच लागू होऊ शकत नाही. पण मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते.
अजूनही ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. मी शांत बसलो आहे. लोकंसुद्धा मला विचारत आहेत की शांत का बसला आहात. पण वेळप्रसंगी मी यावर बोलेन. सरकारकडून अनेक गोष्टी अशा घडत आहेत ज्या बरोबर नाहीत. लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा नाहीतर मराठा समाज गप्प बसणार नाही.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, पाच मूलभूत प्रश्न आहेत ते मी वेळोवेळी मांडले आहेत. हे सरकारच्या हातातील विषय आहेत. आरक्षण टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. ओबीसींना शिक्षणामध्ये सवलती मिळत आहेत तसेच मराठा समाजाला द्या. आत्महत्या केलेल्या मुलाला दहा लाख रुपये देण्याचे एकच काम सरकारने केले आहे.
त्यामुळे अजूनही काही झालेले नाही हेच मला परखडपणे सांगायचे आहे. याआधी मराठा समाजाने ५८ मोर्चे काढून समाजाच्या भावना व्यक्त केल्या असून आजपर्यंत आम्हीही बोललो आहोत, आता लोकप्रतिनिधींनी समाजासाठी काय केले, हे सांगण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकाकडून आरक्षणाबाबत टोलवा-टोलवी केली जात आहे, उपसमितीच्या अध्यक्षांनी समाजाची दिशाभूल करू नये.
If the government does not take a decision, the Maratha community will not remain silent, Chhatrapati Sambhaji Raje warned
महत्त्वाच्या बातम्या
- हौथी बंडखोरांकडून अबूधाबी विमानतळाजवळ ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट, दोन भारतीयांसह तीन जण ठार
- पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलली; १४ ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान
- यूएई मधील विमानतळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले तीन मोठे स्फोट; मृतांमध्ये दोन भारतीय एक पाकिस्तानी
- मोठी घोषणा : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून, 15 ते18 वयोगटाचे लसीकरणही लवकरच पूर्ण होणार