प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटावर टीका करत असतात. या रोजच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांना राऊतांनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्याची जबाबदार दिली आहे. If Sanjay Raut targets BJP leaders continuously then will target Uddhav and aditya Thackeray, warned nitesh rane
गुरुवार, २७ एप्रिलपासून त्याचा प्रारंभ झाला आहे. संजय राऊतांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदूर्ग येथून पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना इशाराही दिला.
‘सकाळच्या भोंग्याची हवा काढण्याची जबाबदारी माझ्या वरिष्ठांनी माझ्याकडे दिली आहे. त्यामुळे आजपासून भाजपचे प्रमुख नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा , देवेंद्र फडणवीस, बावनकुळे किंवा नारायण राणे जे प्रमुख नेते आहेत, त्यांच्यावर संजय राऊतने कुठलाही खोटानाटा आरोप केला, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली किंवा त्यांच्यासंदर्भात अपशब्द वापरला, तर संजय राऊतने ही माझी पहिली पत्रकार परिषद पाहावी आणि आवश्य सेव्ह करून ठेवावी. नाहीतर नितेश राणेंनी मला सांगितले नव्हते की, मला इशारा देणार आहे किंवा माझी इज्जत काढणार आहेत. म्हणून पहिल्या वेळीच सांगतो, आमच्या कुठल्याही भाजपच्या नेत्यावर खोटा आरोप केला किंवा अपशब्द वापरला, तर संजय राऊतने एक लक्षात ठेवावे की, आम्ही ऑरिजनल शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे ओरिजनला शिवसैनिक म्हणून आम्ही मोठे झाले आहोत. संजय राऊतासारखे आम्ही चायनिज मॉडेल नाही,’ अशी नितेश राणेंनी टीका केली.
नितेश राणे म्हणाले की, ‘हल्ली आलेल्या संजय राऊताने शिवसेनेबद्दल बोलणे किंवा बाळासाहेब ठाकरेंविषय बोलणे हे त्यांच्या लायकीचे नाही. म्हणून त्याने यापुढे विचार करून भाजपच्या नेत्यांविषयी बोलावे. मी त्याला हेही आव्हान करेल की, संजय राऊतासारखी माणसे बाजारात विकत भेटतात, चोर बाजारात फार स्वस्त दरात भेटतात, त्यांना कोणीही विकत घेऊ शकते. पण संजय राऊत भाजप नेत्यांविषयी बोलले तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे सुद्धा ठेवणार नाही. ठरा-ठरा फाडेन. जर एकाही भाजप नेत्यावर संजय राऊत बोलला तर मी अर्ध्या तासांत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सगळे कपडे फाडेन. म्हणून त्याने आता ठरवावे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची किती इज्जत ठेवायची आणि किती अंगावर कपडे ठेवायचे हे आजपासून ठरवू.
‘तुला जर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची खुमखुमी एवढीच आहे. तुला वाटत असेल भाजपमध्ये आल्यानंतर ईडी, सीबीआयच्या कारवाया बंद होतात. जर तुझ्याकडे एवढेच पुरावे आहेत ना, तर इकडे, तिकडे माध्यमांसोबत फिरण्याची काहीच गरज नाही. सर्वोच्च न्यायालय आहे, जा तिकडे आणि ऑर्डर आणा. या भाजपच्या नेत्यावर खटला चालवा, कारवाई करा, ईडीला निर्देश द्यायला लावा. कोणी थांबवले आहे. आम्ही काही हात बांधले नाहीत. पण त्यापुढे हेही ठरवावे की, भ्रष्टाचाराचा आरोप उद्धव ठाकरेंवर झालेला आहे, खुनाचा आरोप हा आदित्य ठाकरेंवर झालाय, भ्रष्टाचाराचे प्रकरण हे नंदकिशोर चतुर्वेदीचेही आहेत, हे पाटणकरचेही आहेत. दिशा सालियान, जया जाधव यांच्या खुनाचा आणि ठाकरे कुटुंबियांचा काय संबंध आहेत हे पण प्रकरण बाहेर येतील, त्याही संबंधित त्यांनी ऐकण्याची तयारी ठेवावी. एवढे मी संजय राऊताला सांगेन’, असे नितेश राणे म्हणाले.
If Sanjay Raut targets BJP leaders continuously then will target Uddhav and aditya Thackeray, warned nitesh rane
महत्वाच्या बातम्या
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’
- Operation Kaveri: सुदानमधून भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान, नागरिकांच्या ‘भारतीय सेना झिंदाबाद, पीएम मोदी झिंदाबाद’च्या घोषणा
- पुंछ हल्ल्यानंतर पाकिस्तानला भरली धडकी, आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ची भीती
- चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस