विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला अडचणीत आणले असे वरवर जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर या कृतीतून नेमकी कोणाची मते फोडणार आहेत??, हा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. कारण औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून प्रकाश आंबेडकर जर जुनाच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हा प्रयोग करणार असतील तर मुस्लिमांच्या मतांचे ध्रुवीकरण आंबेडकरांच्या बाजूने होईल आणि एमआयएम पक्षाला त्याचा तोटा होणार असेल तर मग नेमका लाभ कोणाचा होईल??, हा प्रश्न आहे. If Prakash Ambedkar gets votes by carrying flowers on Aurangzeb’s grave, then who will burst?
राष्ट्रवादीच्या जळगावच्या शिबिरात शरद पवारांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष पुरोगामी राजकारणावर भर देताना उघडपणे नवाब मलिकांची बाजू घेतली. यातला राजकीय भाग सोडून दिला तर ज्या मुस्लिम मतांच्या आधारासाठी राष्ट्रवादीने सामाजिक दृष्ट्या कंबर कसली आहे, त्याचाच आधार प्रकाश आंबेडकर आपल्या राजकीय कृतीतून काढून घेत असतील तर नुकसान कोणाचे होईल??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही.
प्रकाश आंबेडकरांची औरंगजेब कबरीला भेट वाहिली फुले, औरंगजेबाच्या राज्यासाठी दिला जयचंदांना दोष!!
जळगावच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधताना वंचित मुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. पण हे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादीने नेमकी काय पावले उचलली??, याविषयी मात्र प्रश्न पत्रकारांनी प्रश्न विचारला ना पवारांनी उत्तर दिले!!
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहून जर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणार असेल आणि ती ध्रुवीकरणातही वाटा आणि घाटा होणार असेल, तर प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेला परसेप्शनच्या पातळीवर अडचणीत आणत असले तरी मते कुणाची फोडतील??, या प्रश्नाचे उत्तर नजीकच्या काळात मिळेल.
पण इथेही मूळ मुद्दा केवळ प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुले वाहणे आणि त्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर त्यापलीकडे जाऊन त्या ध्रुवीकरणावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्यक्ष राजकीय कृतीतून काय तोड काढतात??, हा कळीचा मुद्दा आहे. जोपर्यंत ते तोड न काढता केवळ प्रकाश आंबेडकर अथवा अन्य कोणावरी तोंडी शरसंधान साधत राहतील, तर त्यांना या प्रश्नावर खरे उत्तर मिळणार नाही. पत्रकार परिषदांमध्ये फक्त तोंडाच्या वाफा निघतील, एवढेच महाराष्ट्रात घडण्याची शक्य आहे.
If Prakash Ambedkar gets votes by carrying flowers on Aurangzeb’s grave, then who will burst?
महत्वाच्या बातम्या