विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये अटक झाली आहे. या प्रकरणामध्ये आर्यनने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा जामीन अर्ज आज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीपीच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरून एक व्हिडिओ शेअर करत भाजप, एनसीबी विरूध्द मोठे खुलासे केले आहेत.
If NCB’s Sameer Wankhede’s call recording is released, all cases will be found to be fake: Minorities Minister Nawab Malik to give all evidence next week
“याआधी जेव्हा रेव्ह पार्टी व्हायची, त्यावेळी संशयित म्हणून पकडण्यात आलेल्या लोकांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेऊन त्यांना सोडले जायचे. त्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल त्यांनाच अटक करून कोर्टासमोर हजर केले जायचे. पण मागील एका वर्षामध्ये एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले त्यांना डायरेक्ट अटक केली आहे. त्यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतले गेलेले नाहीयेत. ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणारच नाहीयेत म्हणून ही टेस्ट घेतली गेलेली नाहीये. फक्त व्हॉट्सअॅपच्या च्या आधारावर यांना आरोपी ठरवले आहे. या सर्व केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नाहीत” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
पुढे ते म्हणतात की, भाजप एनसीबी आणि मुंबईतील काही गुन्हेगार मिळून मुंबईमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर केला जातोय आणि या सर्व गोष्टींचे पुरावे पुढील आठवड्यामध्ये निश्चितपणे देणार आहोत. अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली आहे.
एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना ते म्हणतात, सध्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी काम करत आहे. समीर वानखेडे यांचे मोबाइल, व्हॉट्सअॅप चॅट आणि फोन रेकॉर्डिंगवर रिलीज केले तर सर्व केस कशी बनावट आहे हे तुम्हाला लक्षात येईल. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठीचे हे प्रयत्न चालू आहेत. असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर समीर वानखेडे यांनी फक्त दोन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सत्यमेव जयते’ इतकीच प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
If NCB’s Sameer Wankhede’s call recording is released, all cases will be found to be fake: Minorities Minister Nawab Malik to give all evidence next week
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत
- Aryan Khan Drugs Case : एनसीबीच्या हाती ड्रग्जशी संबंधित आर्यनच्या चॅट्स, पार्टीच्या आधीही एका बड्या अभिनेत्रीशी चॅटिंग