शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे आणि हिंदुत्वाबाबत वक्तव्य केलं आहे. जिनांनी पाकिस्तानची मागणी केली होती, त्यामुळे ते जर खरे ‘हिंदुत्ववादी’ असते तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या, असं राऊत यांनी म्हटलं आहे. If he was a true pro Hindu, he would have shot Jinnah, why did he kill Gandhi says Sanjay Raut on Nathu ram Godase
वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे आणि हिंदुत्वाबाबत वक्तव्य केलं आहे. जिनांनी पाकिस्तानची मागणी केली होती, त्यामुळे ते जर खरे ‘हिंदुत्ववादी’ असते तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
असे केले असते तर ते कृत्य देशभक्तिपर ठरले असते, असे संजय राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, गांधींच्या निधनाने आजही जग शोकसागरात बुडाले आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘कोणी खरे हिंदुत्ववादी असते तर त्यांनी जिनांना गोळ्या घातल्या असत्या. गांधींना गोळ्या कशाला? जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली होती. देशाची फाळणी कोणी केली, पाकिस्तानची मागणी कोणी केली, म्हणजेच जिनांना गोळ्या घालायला हव्या होत्या. तुमच्यात हिम्मत असती तर तुम्ही जिनांना गोळ्या घातल्या असत्या. गांधींना गोळ्या घालणे योग्य नव्हते.
राऊत यांच्या वक्तव्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया देत ट्विट केले होते. राहुल गांधींनीही ‘हिंदुत्ववादी’ संज्ञा वापरून बापूंची आठवण काढली. राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘एका हिंदुत्ववादीने गांधींना गोळ्या घातल्या. गांधीजी राहिले नाहीत, असे सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटते. जिथे सत्य आहे, तिथे बापू जिवंत आहेत!’
दरम्यान, आज महात्मा गांधींची 74 वी पुण्यतिथी आहे. या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे.
राहुल गांधींकडून हिंदुत्वाचा मुद्दा
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या राजकारणात उडी घेतली आहे, हे विशेष. अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अनेकदा मांडला आहे. एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांना हिंदू आणि हिंदुत्व या शब्दांमधील फरक लोकांना सांगायचा आहे. ते म्हणाले होते, ‘महात्मा गांधी हिंदू होते, गोडसे हिंदुत्ववादी होते. फरक काय आहे? मी तुम्हाला फरक सांगेन. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. मरतो, खपतो, हिंदू सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रह आहे. तो आपले संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवतो.”
If he was a true pro Hindu, he would have shot Jinnah, why did he kill Gandhi says Sanjay Raut on Nathu ram Godase
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, नवीन तथ्यांसह एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज
- पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना एक फेब्रुवारीला जाहीर होणार
- शिलाटणे गावाजवळ अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
- आधी पुनर्वसन, मगच धरण; कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणग्रस्तांची सडेतोड भूमिका; काम पडले बंद