विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लिम आयएएस अधिकाऱ्याबरोबर प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यानंतर घटस्फोटामुळे चर्चेत आलेल्या 2015 च्या यूपीएससी परीक्षेत टॉप आलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी आता लातूरची सून होणार आहेत.IAS officer Tina Dabi to be Latu’s daughter-in-law, IAS officer divorced her Muslim husband
टीना डाबी यांनी यांनी एका मुस्लिम समाजातील अधिकाऱ्यासोबत लग्न केलं होतं. पहिलं लग्न काही कारणास्तव टिकलं नाही. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्या विवाह बंधनात अडकणार आहेत. टीना या महाराष्ट्रातील लातूरच्या सुनबाई होणार आहेत. त्यांचे लग्न प्रदीप गावंडे यांच्याशी होणार आहे.
आपल्या होणाऱ्या पतीची जात हा एक बोनसपाईंट असल्याचं टीना एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रदीप गावंडे यांचा हा टीना प्रमाणेच दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम केलं आहे.आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. प्रदीप यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा 22 एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
2015 च्या यूपीएससी निकालानंतरच सोशल मीडियावर चर्चा होती की टीना डाबी यांनी जातीचा फायदा घेत परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तेव्हा लोक आरक्षणावरुन प्रश्न उपस्थित करत होते आणि टीना यांच्यावर टीकाही झाली. वास्तविक पाहता त्यावेळी टीना डाबी आरक्षणाच्या कट ऑफ अंतर्गत यूपीएससीची प्रिलिम्स पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झाल्या होत्या.
एससी/एसटी प्रवगार्तील कमी कट ऑफ गुणांमुळे त्या मुख्य परीक्षा देऊ शकल्या. तर सर्वसाधारण गटातील अनेक उमेदवार त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवणूणही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकले नव्हते.
फायनल रिझल्ट वेळी त्या ओव्हर ऑल टॉपर राहिल्या. त्यात प्रिलिमचे मार्क जोडले गेले नव्हते. तरीही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. कारण टीना एसटी कॅटेगरी असूनही त्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिवारातून आहेत.
त्यानंतर टीना या अनेक व्यासपीठावरुन दलित समाजाबाबत बोलताना पाहायला मिळाल्या. मुंबईच्या बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने टीना यांना सन्मानितही केलं होतं. त्यावेळी त्यांनी आज मी जे काही आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असल्याचं म्हटलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या संघषार्तून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
IAS officer Tina Dabi to be Latu’s daughter-in-law, IAS officer divorced her Muslim husband
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीला मोठा दिलासा, कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली
- कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स
- लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…
- काँग्रेसची आंदोलने जोमात, संघटना कोमात : स्वप्ने भाजपला हरवण्याची; पण महत्त्वाच्या राज्यांत प्रदेशाध्यक्षही नाही, 3 राज्यांत तर विरोधी पक्षनेताही ठरला नाही