प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळीने प्रत्युत्तर दिले आहे. I will offer gurumantra to ajit Pawar how to manage guardian ministership of more districts, pinched devendra Fadanavis
माझ्याकडे केवळ एका पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तेव्हा तो एक जिल्हा सांभाळताना माझ्या नाकीनऊ येत होते, आता फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असून ते या सर्व जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार?, असा खोचक सवाल अजित पवार यांनी फडणवीसांना केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी त्यांना गुरुमंत्र देईन
येत्या काळात कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांच्याकडे चार-पाच जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली तर ती कशी पार पाडायची याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना नक्की देईन. मात्र नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आहेत. आणि मी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे, मग सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात!!, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
I will offer gurumantra to ajit Pawar how to manage guardian ministership of more districts, pinched devendra Fadanavis
महत्वाच्या बातम्या
- मिशन 2024 : आज लालू यादव आणि नितीश कुमार यांना भेटणार सोनिया गांधी, विरोधकांना एकत्र आणण्यावर चर्चा शक्य
- चंदीगड MMS प्रकरण : चंदीगड घटनेबाबत भारतीय लष्कराने आरोपी जवानाबाबत जाहीर केली भूमिका
- दहशतवादावर चीन-पाकिस्तानला फटकारले, भारताचे पाच संकल्प : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाचे महत्वाचे मुद्दे
- राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण? : आज आमदारांच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय, मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन जयपूरला जाणार