• Download App
    कंगनाने केलेल्या विधानाबाबत मी अगदी सहमत आहे. भीक मागून मिळालेले हे स्वातंत्र्य ; अभिनेते विक्रम गोखले | I totally agree with Kangana's statement. This freedom gained through begging; Actor Vikram Gokhale

    कंगनाने केलेल्या विधानाबाबत मी अगदी सहमत आहे. भीक मागून मिळालेले हे स्वातंत्र्य ; अभिनेते विक्रम गोखले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : देशातील सर्वोच्च पद्मा अवॉर्ड जो देशातील आदर्श नागरिकांना दिला जातो. त्यांचे चरित्र आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीला पाहून दिला जातो. कंगना राणावत ही हेट स्पीच देणे, जातीयवादी कमेन्ट करणे, समाजात फूट पाडणारी विधाने करण्यासाठी ओळखली जाते.

    I totally agree with Kangana’s statement. This freedom gained through begging; Actor Vikram Gokhale

    तरीही देशातील हा सर्वोच्च अवॉर्ड मिळाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने लगेचच आपल्या देशासाठी रक्त सांडलेल्या क्रांतिकारकांचा अवमान करत एक खळबळजनक विधान केले होते. तिच्या म्हणण्यानुसार भारताला स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालेले आहे. खरे स्वतंत्र 2014 मध्ये म्हणजे जेव्हा भाजप सरकार आले त्या वेळी मिळाले असे ती म्हणते. राजकीय करिअर सुरू करण्यासाठी तिने सुरू केलेल्या अट्टाहासाचे कौतुक करावे की टीका करावी, यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होतात. असो.

    कंगनाच्या या विधानाला सहमती दर्शवत विक्रम गोखले यांनी पुण्यात एक विधान केले आहे. ते म्हणतात, कंगना जे बोलते ते बरोबरच आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालेले आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांना फाशीची शिक्षा झाली. त्या लोकांची फारशी वाचवण्याचा केंद्रय राजकारणामधील त्या काळातील लोकांनी का प्रयत्न केला नाही? त्यांच्या बलिदानाचा अवमान नाही का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.


    कंगना रनौतच्या वक्तव्याविरोधात देशभरात वादाचे मोहोळ, अनेक राज्यांत गुन्हे दाखल


    पुढे ते म्हणतात, आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण सरकारला निवडून देतो. तेव्हा आपला हा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा. की तुम्ही हे काय करता आहात? कोणताही मोठा खर्च होत असेल तर त्याचे ऑडिट जनतेला माहीत असले पाहिजे. आपण पैसे भरतो, या पैशातून देश चालतो. काही लोक हा पैसा चोरून बाहेरील स्विस बँकेमध्ये नेऊन ठेवतात. कर भरणारा सामान्य माणूस मात्र गरीब राहतो आणि श्रीमंत श्रीमंत होत जातो. तर तुम्ही या पैशाचे काय करत आहात? असा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे.

    कंगनाने केलेल्या विधानाबाबत मी अगदी सहमत आहे. भीक मागून मिळालेले हे स्वातंत्र्य आहे. मतपेटीचे राजकारण सुरू झाल्यापासून वादाला काहीही कमी नाहीये. कुठल्याही फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात यामध्ये सगळेच आले. एकही असा पक्ष नाही जो वादामध्ये पडत नाही. अशी प्रतिक्रिया या वेळी विक्रम गोखले यांनी बोलताना दिली आहे.

    I totally agree with Kangana’s statement. This freedom gained through begging; Actor Vikram Gokhale

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!