• Download App
    मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली , ती काढून घेणे कोणाच्याही हातात नाही - समीर वानखेडेI got the uniform from the President, it is not in anyone's hands to take it off - Sameer Wankhede

    मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली , ती काढून घेणे कोणाच्याही हातात नाही – समीर वानखेडे

    समीर वानखेडे यांची नोकरी वर्षभरात जाणार तसेच वानखेडे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मलिक म्हणाले आहे.I got the uniform from the President, it is not in anyone’s hands to take it off – Sameer Wankhede


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील काही महिन्यांपासून ड्रग्स तस्करी आणि बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन सर्वांसमोर आले. एनसीबीच्या टीमने अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेक बड्या सेलिब्रेटींना अटक केली. यामध्ये एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे.

    अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांची नोकरी वर्षभरात जाणार तसेच वानखेडे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मलिक म्हणाले आहे.



    नवाब मलिक यांनी आज समीर यांच्यासंदर्भात ट्विट करत खळबजनक खुलासे केले आहेत.त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. वानखेडे म्हणाले की ,”मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली; ते काढणे कोणाच्याही हातात नाही .मी त्यांना शुभेच्छा देतो”

    ड्रग्ज हा सर्वात जास्त आर्थिक फायदा करून देणारा अवैद्य व्यापर आहे. विमान, जहाज, रेल्वे आणि रस्त्याने हा ड्रग्ज देशात येतो. याला आळा घालण्याची जबाबदारी ही अमदी पदार्थ नियंत्रण विभागाची आहे. आम्ही ते थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अस समीर वानखेडे म्हणाले.

    I got the uniform from the President, it is not in anyone’s hands to take it off – Sameer Wankhede

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी