Sunday, 4 May 2025
  • Download App
    समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपामुळे मला धमक्यांचे फोन येत आहेत : नवाब मलिक | I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik

    समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपामुळे मला धमक्यांचे फोन येत आहेत – नवाब मलिक

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. डिसेंबरमध्ये जेव्हा सर्व बॉलीवूड मालदीवमध्ये सुट्ट्यासाठी गेले होते. त्यावेळी समीर वानखेडे देखील मालदीवमध्ये जाऊन वसुलीचे काम करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

    I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik

    नुकताच नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आपल्या धमकी देणारे फोन असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार नवाब मलिक यांनी याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे असं सांगण्यात येते


    Nawab Malik vs Fadanvis:नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …


    या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरमध्ये मी दुबईला गेलो नव्हतो किंवा कुठेही वसुली करण्यासाठी गेलो नव्हतो असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालदीवला आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गेलो होतो आणि ऑफिशियली सुट्टी घेऊन मी गेलो होतो. याची चौकशी केली तर तुम्हाला सर्व प्रकरण कळेल. असे देखील समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

    I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा