विशेष प्रतिनिधी
सांगली : पुराचा फटका बसलेल्या सांगली शहरातील रस्ते स्वच्छतेच काम सुरु झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने देशी बनावटीची हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम जुन्या फायर फायटर गाडीवर बसविली आहे. पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कल्पनेतून ही हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम तयार केली आहे. Hydraulic washing system on a firefighter vehicle; Useful For Cleaning Roads
अशा पद्धतीची सिस्टीम असणारी गाडी स्वीडनमध्ये वापरात आहे. आशा स्वीडन टाईप गाडीप्रमाणे तांत्रिक व्यवस्था महापालिकेच्या अग्निशमन गाडीवर बसवण्यात आल्या आहेत. या अग्निशमन गाडीच्या पुढच्या बाजूला हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम बसविली आहे. त्या द्वारे रस्त्यावरील माती, चिखल गाडी पुढे जाताना साफ होणार आहे. महापालिकेचे अभियंता वैभव वाघमारे आणि मनोज वझे यांनी हा देशी जुगाड वापरला आहे. ही गाडी सांगलीतील मुख्य मार्गावर चिखल बाजूला काढून रस्ते स्वच्छ करण्याचे काम करणार आहे , अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी दिली.
- हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिमद्वारे रस्त्यांची स्वच्छता
- अभियंता वैभव वाघमारे, मनोज वझे यांनी साकारली
- फायर फायटर गाडीवर हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम
- रस्त्यावरील चिखल, माती स्वच्छतेसाठी उपयुक्त
- स्वीडन टाईप गाडीप्रमाणे तांत्रिक व्यवस्था उभारली
Hydraulic washing system on a firefighter vehicle; Useful For Cleaning Roads
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेणाऱ्या नागरिकांना रोख डॉलर्स तर कुठे चक्क मोटार किंवा गायीचे बक्षीस
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा