वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात अनेक ठिकाणी कोयता टोळ्यांनी दहशत माजवली असताना पुणे पोलिसांनी कोयता टोळ्यांचे मूळच खणून काढण्याचे ठरवले आहे. कोयता टोळ्यांना कोयते आणि प्राणघातक शास्त्रे पुरवठा करणारा दुकानदार हुसेन राजगरा याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. बोहरी अळीतील त्याच्या दुकानातून पोलिसांनी 105 कोयते जप्त केले आहेत. Hussain Rajgara, a shopkeeper who supplied koyta gangs, was arrested from Pune
पुण्यात अनेक ठिकाणी आणि उपनगरांमध्ये कोयता टोळ्यांनी दहशत माजवली होती. त्यापैकी एका कोयता गुंडाला पोलिसांनी भर रस्त्यावर जबरदस्त धुतल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्या दोन पोलिसांना पोलीस दलाने 50 हजारांचे बक्षीस देखील दिले होते. पण या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील कोयता टोळ्यांना जरब बसवण्याच्या दृष्टीने पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. त्यातूनच कोयता पुरवठादार हुसेन राजगरा या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील आहे कोयता विक्रेता
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविवार पेठेत बोहरी अळीत हुसेन राजगरा याचे दुकान आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील आहे. हुसेन राजगरा हाच आपल्या दुकानातून अनेक तरुणांना कोयत्याचा पुरवठा करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण कोयत्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहेत. गेल्या 1 महिन्यात 8 ते 10 ठिकाणी या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोयता पुरवठादारालाच पोलिसांनी अटक करून 105 कोयते जप्त केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
Hussain Rajgara, a shopkeeper who supplied koyta gangs, was arrested from Pune
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, पण सरकार पडण्याची राऊतांची तारीख टळली; 14 फेब्रुवारीला पुढची सुनावणी
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण
- जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ गंगेवर चालणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन