विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचे गुढ अखेर उकलले आहे. त्यांचे पती संदीप वाजे यांनीच त्यांचा जाळून खून केला. त्यानंतर स्वत:च डॉ. सुवर्णा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणी संदीप वाजेला अटक करण्यात आली आहे.Husband himself burnt Dr. Suvarna Waje, Husband himself launched complaint of disappearance
२६ जानेवारी रोजी नाशिकच्या विल्होळीनजीक जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या सांगाड्यामुळे खळबळ उडाली होती. हा सांगाडा बेपत्ता डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा असल्याचे तपासात समोर आले. कौटुंबिक वादातून सुवर्णा यांचे पती संदीप वाजे यांनीच त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
पोलीसांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. वाजे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु होते. या वादाच्या अनेक ठिकाणी नोंदी झाल्या असून याच वादातून पती संदीप वाजे यांनी हत्या केली. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर नाशिक पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. २ फेब्रुवारीला पोलिसांनी संदीप वाजे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
बराच वेळ चाललेल्या चौकशीनंतर या प्रकरणात संदीप वाजेचा सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणात आणखीही काही संशयित आहेत, मात्र त्यांची नाव आताच उघड करणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ठेकेदार असलेल्या संदीप वाजेसोबत या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होतं का याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती पोलिसांनी दिली नाही.
या हत्येमागे कोणतेही राजकीय कारण नसून पोलीस या कटात आणखी कोण सहभागी होतं आणि हत्येमागचं मुळ कारण काय याचा लवकरात लवकर शोध घेतील अशी माहिती अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे या २५ जानेवारी रोजी मोरवाडी हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या. रात्री कामावरून त्या निघाल्याही होत्या. रायगड नगर जवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत सांगाडा आढळून आला होता.
रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली. परंतु त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. जळालेली कार ही वाजे यांचीच असल्याचे चेसीज नंबरच्या मदतीने पोलिसांनी स्पष्ट केले. डॉ. वाजे यांचे वाहन आढळलेल्या ठिकाणापर्यंत जाणाºया मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले जात होते.
Husband himself burnt Dr. Suvarna Waje, Husband himself launched complaint of disappearance
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; केंद्र आणि राज्य सरकारकडे चौकशीची मागणी
- भारतात पहिली EMU ट्रेन धावली ९७ वर्षांपूर्वी
- संसदेत भाषेवरून वाद : इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला ज्योतिरादित्य सिंधियांनी हिंदीत दिले उत्तर, थरूर म्हणाले – हा तर अपमान!
- मोठी बातमी : चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाला भारताचे राजदूत जाणार नाहीत, दूरदर्शनवर प्रसारणही नाही