लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविली आणि या पर्यटकांची सुटका केली.तब्बल १०२७ पर्यटकांची सुखरूप सुटका केली .Hundreds of tourists stranded near Sikkim during Christmas holiday
विशेष प्रतिनिधी
सिक्कीम : २५ डिसेंबरला नाताळ सुट्टी साजरी करण्यासाठी सिक्कीमच्या चांगू तलावाजवळ आलेले शेकडो पर्यटक अडकले.चांगू तलाव हा पूर्व सिक्कीमच्या टोकाला असून येथून चीन सीमा जवळ आहे. दरम्यान अचानक जोरदार हिमवृष्टी सुरू झाल्यामुळे येथील जवाहरलाल नेहरू रस्ता बंद झाला होता.यावेळी लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविली आणि या पर्यटकांची सुटका केली.तब्बल १०२७ पर्यटकांची सुखरूप सुटका केली .
पर्यटक अडकल्याचे वृत्त समजताच लष्कराने युद्धपातळीवर बचाव मोहीम हाती घेतली.तसेच रात्री जवानांच्या छावण्यांमध्ये पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. रविवारी सकाळी हवामानात थोडी सुधारणा झाली. मग पर्यटकांचे छोटे गट केले दरम्यान गंगटोकपर्यंत सुमारे ४० किलोमीटर पर्यटक पायी गेले. लष्कराचे जवानही त्यांच्याबरोबर होते. सोमवारी उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.
Hundreds of tourists stranded near Sikkim during Christmas holiday
महत्त्वाच्या बातम्या
- Congress Foundation Day : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल- लोकशाहीला बगल देऊन हुकूमशाही चालवली जातेय!
- रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटीलांनी केला निषेध
- मोठी बातमी : राज्यपालांचे बंद लिफाफ्यात मिळाले उत्तर, पवार-ठाकरेंची फोनवर चर्चा, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलली
- टायगर खतरे में है : महाराष्ट्रात ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ६५ जणांनी गमावले प्राण