प्रतिनिधी
मुंबई / कोल्हापूर : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे घातले. त्यानंतर तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. त्याचवेळी हसन मुश्रीफ यांचे सर्व समर्थक त्यांच्या घराबाहेर शक्तिप्रदर्शन करत होते. पण त्यानंतरही हसन मुश्रीफ यांना ईडीने पुढच्या तपासासाठी कायदेशीर समन्स बजावले आहे. Huge show of force after ED raids, yet summons to Hasan Mushrif for further questioning
ईडीने गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे घातले. ईडीच्या पथकाने तब्बल साडेनऊ तास ईडीचे पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेतली. हे पथक दुपारी 4.00 वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडले.
यानंतर हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी, 13 मार्च रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरे जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. विशेष म्हणजे या छापेमारीच्या वेळी हसन मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते.
Huge show of force after ED raids, yet summons to Hasan Mushrif for further questioning
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरू-म्हैसूर प्रवास आता तीन तासांऐवजी फक्त ७५ मिनिटांत पूर्ण होणार
- Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
- राष्ट्रवादीच्या वाड्याला सुरूंग; जिल्हा बँक निवडणुकीत नगर नंतर जळगावातही राष्ट्रवादीला भाजपचा झटका!!
- संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी