• Download App
    नवाब मलिक तुरूंगात, तर अजितदादा पवार बाहेर कसे??; असदुद्दीन ओवैसी यांचा उत्तर प्रदेशातून खोचक सवाल!! How Nawab Malik is in jail and Ajit Pawar is out

    नवाब मलिक तुरूंगात, तर अजितदादा पवार बाहेर कसे??; असदुद्दीन ओवैसी यांचा उत्तर प्रदेशातून खोचक सवाल!!

    प्रतिनिधी

    लखनऊ : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सध्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून ते समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर जोरदार तोफा डागताना दिसत आहेत.How Nawab Malik is in jail and Ajit Pawar is out

    आज प्रचार सभेमध्ये त्यांनी फक्त अखिलेश यादव यांच्यावरच ते तुटून पडले असे नाही, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर देखील त्यांनी उत्तर प्रदेशातून तोफ डागली.

    असदुद्दीन ओवैसी म्हणाले, तुम्हाला नेता नसेल तर तुमचा आवाज कोणापर्यंतही पोहोचणार नाही. तुम्हाला तुमचेच नेते बनावे लागेल. आझम खान हे अखिलेश यादव यांचे मंत्री होते. खासदार होते. पण ते आज तुरुंगात आहेत आणि अखिलेश यादव मात्र स्वतः बाहेर आहेत. असे का…??, आजम खान तुरुंगात तर अखिलेश यादव बाहेर हे तुम्ही सहन कसे करता??, यासाठी तुम्हाला तुमचा नेता बनवा लागेल.

    एवढेच नाही तर महाराष्ट्रात नवाब मलिक यांना तुरुंगात धाडण्यात आले. पण ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र बाहेर आहेत. असे कसे होऊ शकते??, असा खोचक सवाल देखील असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

    अखिलेश यादव आणि अजितदादा पवार यांची तुलना त्यांनी आझमखान आणि नवाब मलिक यांच्याशी करून थेट हिंदू-मुस्लीम असाच भेद उत्तर प्रदेशाच्या मतदारांसमोर ठेवला आहे. मुसलमान नेत्यांना तुरुंगात घातले जाते असाच त्यांचा थेट आरोप दिसतो आहे. उत्तर प्रदेशात अद्याप तीन टप्प्यातले मतदान शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांचे यांची ही राजकीय खेळी समाजवादी पक्षासाठी घातक ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    शिवाय आजच लवासा लेकसिटी प्रकरणात मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वरच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे ताशेरे ओढले आहेत. पार्श्‍वभूमीवर देखील अजित पवार हे तुरुंगाबाहेर कसे??, असा जो सवाल खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे त्याला देखील राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात महत्त्व आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतो आहे.

    How Nawab Malik is in jail and Ajit Pawar is out

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा