• Download App
    साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना कशी काय? भाजप नेते अतुल भातखळकर यांचा सवाल|How do the leaders of three and a half districts compare with Prime Minister Narendra Modi? Question from BJP leader Atul Bhatkhalkar

    साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना कशी काय? भाजप नेते अतुल भातखळकर यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.How do the leaders of three and a half districts compare with Prime Minister Narendra Modi? Question from BJP leader Atul Bhatkhalkar

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८१वा वाढदिवस झाला, या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या भाषणात, २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होते,



    तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून पंतप्रधान का होऊ शकत नाही? असं विधान केलं होतं. यावरून अतुल भातखळकर यांनी खासदार कोल्हे यांना टोला लगावताना म्हटले आहे की, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याची तुलना पंतप्रधानांशी करणेच चुकीची आहे.

    अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे कौतुक करत त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली होती. यावेळीते म्हणाले होते की, आता काळाची गरज आहे, देशात परिस्थितीत कुरक्षेत्रात झाली आहे.

    त्यामुळे पुढील वर्षात महाराष्ट्र आणि देश कसा असावा याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी सेनापती म्हणून शरद पवार आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे लढावे लागणार आहे.

    How do the leaders of three and a half districts compare with Prime Minister Narendra Modi? Question from BJP leader Atul Bhatkhalkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ