• Download App
    एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल|How about people of the same caste on the MPSC commission? Why no OBC member? MP Pritam Munde's question in Lok Sabha

    एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. आज यांना ठराविक समाजाचाच कळवळा येत आहे, त्यांना ओबीसींशी काहीच देणंघेणं नाही का?How about people of the same caste on the MPSC commission? Why no OBC member? MP Pritam Munde’s question in Lok Sabha

    ओबीसींना फक्त आपण आपली व्होट बँक म्हणूनच वापरणार आहोत का? एमपीएसी आयोगावर एकाच जातीचे लोक का्य एकाहीओबीसी सदस्याची नियुक्ती का केली नाही असा सवाल भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत बोलताना केला आहे.



    मुंडे म्हणाल्या, ओबीसींची अस्तित्वात असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप राज्य सरकारच्या हातून झालं आहे. हा समाज तुम्हाला या गोष्टीसाठी कधीही माफ करणार नाही. कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यात तिथे कमी पडले आहात. फक्त ओबीसी आरक्षणाचाच मुद्दा नाही तर एमपीएससीबाबतही सरकारचं हेच धोरण राहिलं आहे. पास होऊन देखील दोन-दोन वर्षांपासून नियुक्त्या रखडल्या आहेत.

    त्या मुलांना नियुक्त्या कधी मिळणार आहेत? एमपीएससी आयोगात ठराविक एका जातीतील लोकांचीच सदस्यपदी नियुक्ती केली जाते आणि अन्य जातींकडे दुर्लक्ष केलं जातं. या प्रश्नांबाबत तुम्ही आपली तळमळ दाखवली तर तुम्ही खरंच शोषितांचे, वंचितांचे प्रश्न सोडवता हे सिद्ध होईल.

    आरक्षणाची 50 टक्क्यांची मयार्दा काढण्याची मागणी जे पक्ष आज इथे करत आहेत. त्यांना मला हे विचारायचं आहे की, 50 टक्क्यांचा मुद्दा तर पुढचा आहे, असे सांगून मुंडे म्हणाल्या ओबीसींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण होते. २७ टक्क्यांची मयार्दा ओलांडली हे राज्य सरकारने न्यायालयात कबुल केले तेव्हाच ते काढून घेण्यात आले. आमचे आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे.

    तुम्ही एका जाती किंवा समुदायासाठी सरकार चालवत आहात का? हीच तळमळ आणि हाच कळवळा तुम्ही ओबीसींबाबत दाखवला तर वंचित समाजाप्रती असलेलं तुमचं प्रेम दिसून येईल. केंद्र सरकारने आपलं प्रेम वारंवार सिद्ध केलं आहे. अनेक लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार अमुक एका समाजाला नाही तर सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे.

    How about people of the same caste on the MPSC commission? Why no OBC member? MP Pritam Munde’s question in Lok Sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस