• Download App
    पुण्यात भरदिवसा घरफोडीत चार लाखांवर ऐवज लंपास|House broken incident happened in kondhva and lohgaon area

    पुण्यात भरदिवसा घरफोडीत चार लाखांवर ऐवज लंपास

    कोंढवा आणि लोहगावमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी भरदिवसा साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.


    विशेष प्रतिनिधी

     पुणे-   कोंढवा आणि लोहगावमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी भरदिवसा साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. चोरीच्या घटना २५ ते २६ एप्रिल कालावधीत घडल्या आहेत. याप्रकरणी कोंढवा आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.House broken incident happened in kondhva and lohgaon area

    बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३५ हजारांसह दागदागिने मिळून ३ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २६ एप्रिलला भरदुपारी बाराच्या सुमारास कोंढव्यातील साईराज रेसीडेन्सीमध्ये घडली. याप्रकरणी विनोद हराळे (वय ४८ ) यांनी तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव तपास करीत आहेत.



    अर्धवट घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी रोकडसह दागदागिने मिळून ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास लोहगावमधील शिवकृपा इमारतीत घडली. याप्रकरणी करण लिंगायत वय ३० रा. धानोरी रस्ता यांनी तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करीत आहेत.

    House broken incident happened in kondhva and lohgaon area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस