New proposal for Police Department : राज्य पोलीस दलासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या गृहविभागात एका नवीन प्रस्तावावर काम सुरू आहे. यानुसार राज्य पोलीस दाखल झालेल्या पोलीस शिपाईसुद्धा पीएसआय होऊ शकणार आहे. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्रालयातर्फे अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. home minister Dilip Walse Patil New proposal for Police Department Now Police shipayi can also become PSI Till retirement
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य पोलीस दलासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या गृहविभागात एका नवीन प्रस्तावावर काम सुरू आहे. यानुसार राज्य पोलीस दाखल झालेल्या पोलीस शिपाईसुद्धा पीएसआय होऊ शकणार आहे. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्रालयातर्फे अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करण्यात आलं आहे.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
या ट्वीटनुसार, पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पोलीस दलात काय होणार बदल?
असा निर्णय झाला तर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेली व्यक्ती निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाऊ शकणार आहे. यात पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतील. तथापि, याचबरोबर निवृत्तीपर्यंत पीएसआय होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठीच गृहविभागातर्फे प्रस्तावावर काम सुरू आहे.
5 आणि 6 जुलै रोजी राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. कोरोनाचा हवाला देऊन केवळ दोनच दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे.
home minister Dilip Walse Patil New proposal for Police Department Now Police shipayi can also become PSI Till retirement
महत्त्वाच्या बातम्या
- राफेल मुद्द्यावरून संबित पात्रांचे राहुल गांधींवर शरसंधान, म्हणाले- किमतीवर सतत वेगवेगळी वक्तव्ये केली!
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना EDने बजावला तिसरा समन्स; 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- Pushkar Singh Dhami Profile : वडील सैन्यात, कोश्यारींचे शिष्य.. जाणून घ्या उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींबद्दल सबकुछ
- यूपी जि.पं. निवडणुकीत 75 पैकी 65 जागांवर भाजपचा झेंडा; सपाला मोठा झटका, काँग्रेसने गमावला जनाधार
- ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा