• Download App
    ‘हिंदुस्थानी भाऊ’ला धारावी पोलिसांकडून अटक, विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप। Hindustani Bhau' arrested by Dharavi police, accused of inciting students

    ‘हिंदुस्थानी भाऊ’ला धारावी पोलिसांकडून अटक, विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

    मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. त्यांना भडकवल्याच्या आरोपावरूनसोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला पोलिसांनी अटक केली आहे. Hindustani Bhau’ arrested by Dharavi police, accused of inciting students


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. त्यांना भडकवल्याच्या आरोपावरूनसोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला पोलिसांनी अटक केली आहे.
    पाठक याने विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले . त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.

    विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं.



    दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

    नागपूरमध्येही ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहनावरून क्रीडा चौक भागात हजारो विद्यार्थी दुपारी १२च्या सुमारास गोळा झाले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा, शिक्षण ऑनलाइन असताना परीक्षा ऑफलाइन कशा, असा सवाल करीत, ‘हिंदुस्थानी भाऊ’चा जयजयकार करण्यात आला. मेडिकल चौक येथे मोर्चा येताच काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हिंसक होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु एका गटाने पंडित बच्छराज शाळेसमोरील स्कूल बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे आंदोलन पुन्हा पेटले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पाच विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    Hindustani Bhau’ arrested by Dharavi police, accused of inciting students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!