• Download App
    Hindu janjagruti samiti memebers Human chain Near Khadakvasla Dam to prtotect environment% The Focus India

    मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण

    ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ अंतर्गत सलग 20 व्या वर्षीही राबविण्यात आले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. या वेळी 100 हून अधिक उपस्थित कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंग खेळून येणार्‍यांना रोखले अन् त्यांचे प्रबोधनही केले.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे – धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग 20 व्या वर्षीही करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 18 मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी 100 हून अधिक उपस्थित कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंग खेळून येणार्‍यांना रोखले अन् त्यांचे प्रबोधनही केले.

    Hindu janjagruti samiti memebers Human chain Near Khadakvasla Dam to prtotect environment

    धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्र विसंगत आहे. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. या प्रसंगी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे संचालक, गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडित यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या वेळी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक भोसले, इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे विठ्ठल जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

    हिंदु जनजागृती समिती मागील 19 वर्षे हा उपक्रम राबवत आहे. हे सातत्य वाखाणण्याजोगे आहे. संपूर्ण दिवसभर जलाशयाचे रक्षण करणे हे सामाजिक बांधिलकीचे काम ही संस्था करत आहे. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होऊन सर्वाना शिस्त लावण्याचे कार्य करत आहेत असे म्हणून उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकिर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत आणि दत्तात्रय कापसे, पुणे मनपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, गोर्‍हे ग्रामपंचायत सदस्य बाबा खिरीड, साहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे आणि ग्रामस्थ यांनीही अभियान स्थळी भेट दिली.

    प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 7 पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून अभियान राबवण्यात आले. या अभियानाला पोलीस-प्रशासनाचेही उत्तम सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 22 मार्चलाही हे अभियान राबविण्यात येणार आहे.

    Hindu janjagruti samiti memebers Human chain Near Khadakvasla Dam to prtotect environment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!