प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय घेण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. High-speed rail development decisions for Maharashtra during Fadnavis’ Delhi visit
हे निर्णय पुढीलप्रमाणे :
- धरावी पुनर्विकास साठी रेल्वेची जमीन मिळवण्याच्या मंजुरी.
- समृद्धी महामार्गच्या पॅरालल हायस्पीड ट्रेन आणि हाय स्पीड कार्गो साठी मंजुरी
- मुंबई – सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी, आणि होकार.
- नाशिक – पुणे हाय स्पीड रेल्वे बाबतचा प्रस्ताव.
- नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे.
यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेक चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळणार आहेत. याभागातील सामाजिक-आर्थिक विकासाला सुद्धा यामुळे चालना मिळेल. - या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः फडणवीस पाठपुरावा करीत होते. 18 ऑक्टोबर 2022 रोजी हा कार्यादेश जारी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे नागपूरकरांच्या वतीने फडणवीसांनी आभार मानले.
High-speed rail development decisions for Maharashtra during Fadnavis’ Delhi visit
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??