• Download App
    मुलीच्या जन्माचे स्वागतासाठी चक्क मागविले हेलिकॉप्टर; पुणे जिल्ह्यातील अनोखी घटना । Helicopter Is ordered to welcome the birth of a girl; Unique incident in Pune district

    मुलीच्या जन्माचे स्वागतासाठी चक्क मागविले हेलिकॉप्टर; पुणे जिल्ह्यातील अनोखी घटना

    वृत्तसंस्था

    पुणे : घराण्यात प्रथमच मुलगी जन्माला आली. त्यामुळे तिचे स्वागत करण्यासाठी आणि तिला घरी घेऊन येण्यासाठी हेलिकॉप्टर चा वापर केला. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली. Helicopter Is ordered to welcome the birth of a girl; Unique incident in Pune district
    शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करून आश्चर्याचा धक्का दिला.



    राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म २२ जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी झाला. बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले, जे व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, “आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, हा निर्णय घेतला. त्यासाठी एक लाख रुपये भाडे द्यावे लागले.

    Helicopter Is ordered to welcome the birth of a girl; Unique incident in Pune district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!