मुसळधार पावसाने कुठे पूर , कुठे दुकानात पाणी शिरले तर कुठे शेतीच नुकसान झालं. यादरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.Heavy rains lashed Kolhapur Sangli district
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात सगळीकडे हाहाकार मजवला आहे. मुसळधार पावसाने कुठे पूर , कुठे दुकानात पाणी शिरले तर कुठे शेतीच नुकसान झालं. यादरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी आणि थंड वाऱ्यामुळे ताप, थंडी, सर्दीच्या रुग्णांत वाढ झाली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत कधी ढगाळ, तर कधी कडकडीत उन्हाच्या झळा असे वातावरण झाले होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला.
काल दिवसभर कडकडीत ऊन होते. त्यामुळे उकाडय़ाचा त्रास जाणवत असताना, दुपारी तीननंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसाने सर्वांची दैना उडाली.
दरम्यान सांगली शहरासह जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास सलग पाऊस कोसळत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. या हंगामातील सर्वात मोठा पाऊस म्हणून नोंद व्हावी असा पाऊस आज कोसळला.
दीड तास रस्ते नुसते निर्मनुष्य झाले होते. रस्त्यावर आणि सखल भागात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. यावेळी शिवाजी मंडई, बसस्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात प्राणी साचले होते. भाजी विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांचे हाल झाले.
सांगली शहरासह जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. सलग दीड तास पावसाने जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपून काढले, ढगफुटीसदृश्य पाऊस सांगली शहरात झाला.
Heavy rains lashed Kolhapur Sangli district
महत्त्वाच्या बातम्या
- खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते
- लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले – ‘ऑक्सिजन निर्मिती स्वयंपूर्णतेच्या दिशेने’
- Story Behind SAMANA Editorial: मराठवाड्यात ‘देवेंद्र’ थेट बांधावर-घाव मात्र घरात बसलेल्या ठाकरे-पवार सरकारच्या वर्मावर ! पुन्हा केंद्राकडे बोट दाखवत-पसरले हात …