• Download App
    WATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला । Heavy Rains in Beed district; Crops damage

    WATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला

    बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला पूर आला आहे. तिगाव आणि चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी दळवणाचा प्रश्न उपस्थित झाला. या गावासह अनेक छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांचा संपर्क देखील पूर्णपणे तुटला असून सध्या पुसरा नदीच्या पुलावरून पाणी वाहते आहे. पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर खरिपाचे पिकं नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसानं बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी यासह इतर ठिकाणी झोडपून काढले आहे. Heavy Rains in Beed district; Crops damage

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक