प्रतिनिधी
मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. Hearing on Sanjay Raut’s bail application adjourned again
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या राऊतांच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी वेळेअभावी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक केली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीने सांगितले आहे.
या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Hearing on Sanjay Raut’s bail application adjourned again
महत्वाच्या बातम्या
- गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
- 2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा
- द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी