प्रतिनिधी
मुंबई – नवी दिल्ली – कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात कलगीतुरा रंगला असून राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी महाराष्ट्रात तयार होऊन इतरत्र जाणारा औषधसाठा जप्त करण्याची धमकी दिली आहे. त्याला केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिल्लीतून प्रत्युत्तर दिले आहे. He needs to stop his daily dose of shameless politics and take responsibility
महाराराष्ट्र सरकारने १६ कंपन्यांना रेमडेसिवीरची निर्यात करायला सांगितले, तेव्हा आम्हाला केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधी पुरवू नका असं सांगितलं आहे, अशी माहिती कंपन्यांनी दिली आहे. जर औषधांचा पुरवठा केला नाही, तर परवाने रद्द करू असा इशारा आता या कंपन्यांना देण्यात आलेला आहे. हा धोकादायक पायंडा असून, या परिस्थितीत औषधांचा साठा जप्त करून गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणताही पर्याय नाही, अशी धमकी नबाब मलिक यांनी दिली. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर थेट केंद्रातून मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असे ट्विट पियूष गोयल यांनी केले आहे.
नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी चार ट्वीट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख होते. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र भाजपने देखील नबाब मलिकांना पुराव्यांशिवाय वाट्टेल ते आरोप करू नका, असा इशारा दिला आहे.