प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून पहिल्या निकालात कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाला धक्का बसला आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत या तीन ग्रामपंचायतींमध्ये घाटगे गटाने बाजी मारली आहे. बामणीत शिव शाहू ग्रामविकास आघाडी सरपंच पदासह 8 जागांवर विजयी झाली आहे. शेतकरी विकास आघाडी 2 जागावर विजयी झाली आहे. Hasan Mushrif hit in Kolhapur district; BJP flag
हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेखातून अपमान
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना हसन मुश्रीफ राज्यात मंत्री होते. त्यामुळे त्यांचे कागल तालुक्यात प्रत्येक गावात वर्चस्व होते. पण महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर मात्र हसन मुश्रीफ यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागून धक्क्यावर धक्के बसले आहेत. त्याची चुणूक बामणी, निढोरी, रणदिवेवाडी या गावांमध्ये दिसली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे दूरगामी परिणाम पंचायत समिती निवडणूक ते विधानसभा निवडणूक असा दिसणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 3 हजार 654 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 ते 20 टेबलवर मतमोजणी होईल. त्यामुळे 30 ते 45 मिनिटात 3 ते 4 गावांचे निकाल हाती येतील. सर्व गावांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसरी फेरी घेतली जाईल.
Hasan Mushrif hit in Kolhapur district; BJP flag
महत्वाच्या बातम्या