• Download App
    दोषी बहिणींची फाशी रद्द; आता आजन्म कारावास; रेणुका शिंदे आणि सीमा गावितची याचिका मंजूर । Hanging till death cancelled; now life imprisonment, High court accept plea of Renuka Shinde, Seema Gawit

    दोषी बहिणींची फाशी रद्द; आता आजन्म कारावास; रेणुका शिंदे आणि सीमा गावितची याचिका मंजूर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रेणुका शिंदे आणि सीमा गावित या 9 मुलांच्या हत्याकांडातील दोषी बहिणींना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 20 वर्षं उलटूनही फाशीची अंमलबजावणी न झाल्याने फाशीची शिक्षा रद्द करावी अशी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. Hanging till death cancelled; now life imprisonment, High court accept plea of Renuka Shinde, Seema Gawit



    कोर्टाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली. आधी या प्रकरणाचा निकाल 2001 मध्ये लागला होता. त्या निकालात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या बहिणींची फाशी रद्द झाली तरी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून त्यांना मरेपर्यंत कैदेत राहावे लागेल.

    संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या. सारंग कोतवाल आणि न्या. नितिन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. गावित बहिणींना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली. प्रशासनाच्या या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने हा निकाल देताना नोंदवले.

    Hanging till death cancelled; now life imprisonment, High court accept plea of Renuka Shinde, Seema Gawit

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा