मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सचिन वाझे म्हणजे लादेन नाही असे म्हटले असले तरी वाझेची कृत्ये लादेनपेक्षा कमी नाहीत. अत्यंत थंड रक्ताने त्याने मनसुख हिरेनची हत्या केल्याचा संशय आहे. हिरेन यांच्या तोंडात कोंबलेले रुमाल वाझेने कळवा येथून खरेदी केले होते.Handkerchief found in Manusukh Hirne’s mouthwas bought by Sachin Waze from Kalwa
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सचिन वाझे म्हणजे लादेन नाही असे म्हटले असले तरी वाझेची कृत्ये लादेनपेक्षा कमी नाहीत. अत्यंत थंड रक्ताने त्याने मनसुख हिरेनची हत्या केल्याचा संशय आहे. हिरेन यांच्या तोंडात कोंबलेले रुमाल वाझेने कळवा येथून खरेदी केले होते.
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहावर आढळलेले रुमाल हे सचिन वाझेने विकत घेतल्याचं समोर आले आहे. हे रुमाल कळवा स्टेशन बाहेरुन खरेदी केल्याचे समोर आले आहे. सचिन वाझे ने ते तिथून खरेदी केल्याचे सीसीटिव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे.
मनसुख हिरन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या चेहºयावर काही रुमाल सापडले होते. हे रुमाल सचिन वाझनेच खरेदी केले होते. हे रुमाल सचिन वाझेने कळवा स्टेशन बाहेरील रुमाल विक्रेत्याकडून खरेदी केल्याचं समोर आले आहे.
एनआयएच्या हाती या संदर्भातल सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. ४ मार्चला मनसुख हिरेनची हत्या झाली त्यावेळी सचिन वाझेने सीएसटी ते कळवा असा ट्रेनने प्रवास केला होता. त्यावेळी कळवा स्टेशनवर उतरून स्टेशनच्या बाहेरच हे रुमाल खरेदी केल्याचं तपासात समोर आले आहे.
मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या तोंडावर एक मंकी कॅप होती. मात्र आतमध्ये ५ ते ६ रुमाल घडी घालून ठेवण्यात आले होते. या रुमालांच्या फॉरेन्सिक चाचणीसाठी एनआयएने हे रुमाल पुण्याच्या सीएफएसएल या फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने याची कार एनआयएने जप्त केली आहे. सुनिल माने याच्या घरी एनआयएने छापेमारी केली.
यावेळी काही कागदपत्र आणि कार जप्त करण्यात आली. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.