प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी परिसरात बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्तपणे ही कारवाई केली. Hammer on unauthorized constructions erected by Bangladeshis in Mumbai’s Malvani
मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात बांगलादेशी नागरिक अवैधरित्या स्थलांतर करीत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्याची दखल घेत मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बांग्लादेशी फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या थाटलेल्या दुकानांचाही प्रश्न चर्चेला आला होता. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिले होते.
त्यानुसार, मालवणी (मालाड पश्चिम) परिसरात बांग्लादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील ६ हजार चौरस मीटर जागा मोकळी झाली आहे. या जागेवर खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे.
Hammer on unauthorized constructions erected by Bangladeshis in Mumbai’s Malvani
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!!
- “हा” 2013 चा भारत नाही, देशाची व्यापक आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल; मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्टचा निर्वाळा
- भाजपाचे महाजनसंपर्क अभियान; महाराष्ट्रात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभांचा धडाका
- काँग्रेसचा सगळ्यांना “समान न्याय”, जनतेला लुटण्यात भेदभाव नाय; पंतप्रधान मोदींचे अजमेर मधून शरसंधान!!