• Download App
    शरद पवारांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळेच गुणरत्न सदावर्तेंना अटक!!; जयश्री पाटलांचा पुन्हा आरोप|Gunaratna Sadavarten arrested for exposing Sharad Pawar's Rs 600 crore land scam !!; Jayashree Patel re-accused

    शरद पवारांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळेच गुणरत्न सदावर्तेंना अटक!!; जयश्री पाटलांचा पुन्हा आरोप

    प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढला. त्याविरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्याचा वचपा काढण्यासाठीच गुणरत्न सदावर्ते यांना खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली, असा आरोप सदावर्ते यांच्या पत्नी एडवोकेट जयश्री पाटील यांनी पुन्हा एकदा केला आहे.Gunaratna Sadavarten arrested for exposing Sharad Pawar’s Rs 600 crore land scam !!; Jayashree Patel re-accused

    शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी काल रात्री उशिरा अटक केली. आज किल्ला कोर्टाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने किल्ल्या कोर्टात जयश्री पाटील यांनी देखील केस लढवली.



    गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. परंतु प्रत्यक्षात किल्ला कोर्टाने सदावर्ते यांना फक्त 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर जयश्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

    शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी 600 कोटींचा जमीन घोटाळा केला आहे. त्याची तक्रार मी पोलिसांमध्ये केली आहे. पवारांच्या या घोटाळ्याबाबत सीआयडीने माझे 100 पानांचे स्टेटमेंट नोंदवून घेतले आहे. परंतु त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांना खोट्या केसमध्ये गुंतवून अटक केली आहे, असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

    सुप्रिया सुळे अचानक कशा बोलल्या??

    गेले पाच महिने एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यावेळी सुप्रिया सुळे पुढे येऊन बोलल्या नव्हत्या. मग काल अचानक त्यांना पुढे येऊन एसटी कर्मचाऱ्यांची का बोलावेसे वाटले??. वास्तविक कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी फक्त आम्ही तुम्हाला जॉइनिंगची तारीख सांगू असे एसटी कर्मचाऱ्यांना म्हटले होते.

    मग अशा वेळी असे अचानक काल काय घडले की एकदम सिल्वर ओकच्या दिशेने काही लोक गेले आणि त्यांनी दगड आणि चपला फेकल्या. लगेच सुप्रिया सुळे तिथे पोचून मी बोलायला तयार आहे असे म्हणू लागल्या??, असे सवाल जयश्री पाटील यांनी केले. यामागे फार मोठे षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

    Gunaratna Sadavarten arrested for exposing Sharad Pawar’s Rs 600 crore land scam !!; Jayashree Patel re-accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!