विशेष प्रतिनिधी
जळगाव : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच तोंडावर पडले आहेत. मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे बनविले असे म्हणणाऱ्या पाटील यांना जोरदार टीकेनंतर माफी मागावी लागली.Gulabrao Patil, who claimed to have done Hema Malini’s cheek-like road, fell on his face, apologized after strong criticism
शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील बोदवड येथील प्रचारसभेत एकनाथ खडसे यांना टोला लगावताना पाटील यांची जिभ घसरली. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. माझे आव्हान आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पहावे की मी कसा विकास केला आहे.
माझ्या धरणगावला या आणि तेथिल रस्ते पाहा. सर्व रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून गुलाबराव पाटील यांना टोल लगावला आहे.
गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसतात, असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गुलाबराव पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल झाला नाही तर गाल पाहणाºयांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.
त्या म्हणाल्या, गुलाबराव पाटील हा रांज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय.
गुलाबराव पाटील आणि रांज्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांज्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे.
Gulabrao Patil, who claimed to have done Hema Malini’s cheek-like road, fell on his face, apologized after strong criticism
महत्त्वाच्या बातम्या
- नेहरू जी कह गए इंदिरा से ऐसा पोता आएगा, कैम्पेन करेगा कांग्रेस की और भाजपा को जितवाए, भाजप प्रवक्त्याच्या गाण्यावर कॉँग्रेसवाल्यांनाही हसू
- नव्या कामगार कायद्यात चार दिवस काम तीन दिवस सुट्टी, मात्र कामाचे तास आठवरून होणार बारा तास
- इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा कहर , एकाच दिवसांत बारा हजार नवे रुग्ण
- यूपी निवडणूक सेमीफायनल नव्हे, लोकसभेवर परिणाम नाही; प्रशांत किशोरांचा खरा निष्कर्ष की ममतांचे नॅरेटिव्ह सेटिंग??