• Download App
    उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी । Growers' grapes should be sweet, special aid packages should be given, debt forgiveness should be done; Demand of Raju Shetty

    उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिंगणूर येथे दिला. Growers’ grapes should be sweet, special aid packages should be given, debt forgiveness should be done; Demand of Raju Shetty

    मिरज तालुक्यातील लिंगणूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज,तासगाव, पलूस,जत,कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील ७०हजार एकर वरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे घडकुज, दाव न्या आदीसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बगाचे १०० टक्के नुकसान झाले आहे एकरी चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडे ते चार हजार कोटीचा आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ,धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागात आले होते.



    पाहणीनंतर ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे. फ्लोअरिंग मधील द्राक्ष बागांची घडकुजीने नुकसान झाले आहे तर आगाप छाटणी केलेल्या बागांचे रोगाने नुकसान झाले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे नुकसान झाले आता पावसाने घात केला. या द्राक्ष बागायत दाराच्या पाठीशी ठामपणे शासनाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. द्राक्ष शेतीतून सरकारला दर वर्षी दोन हजार कोटीचे परकीय चलन मिळते त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे हा शेतकरी शासनाच्या मदतीशिवाय स्वाबळवर मेहनतीने द्राक्ष शेती करतो त्यामुळेच नुकसान झाल्यानंतर त्यांना विशेष मदत पॅकेज देण्याची गरज आहे. त्यांची कर्जे माफ करावीत तसेच द्राक्ष पीक विमा योजना आठमा ही आहे ती बारमाही करून सक्षम करावी हे झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू द्राक्ष उत्पादकांचे पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.

    Growers’ grapes should be sweet, special aid packages should be given, debt forgiveness should be done; Demand of Raju Shetty

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस