करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, रिसर्च स्कॉलर्सचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे यूजीसीने म्हटले आहे.Great relief given by the University Grants Commission; Extension of deadline for PhD and MPhil students to submit dissertations
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC ) पीएचडी आणि एमफीलच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शोध प्रबंध सादर करण्याची अंतिम मुदत सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.३१ डिसेंबर २०२१ नंतर पुढे सहा महिने म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर करू शकतील.करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, रिसर्च स्कॉलर्सचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे यूजीसीने म्हटले आहे.
सर्व एमफील, पीएचडी विद्यार्थ्यासाठी ही मुदतवाढ लागू राहणार असल्याचंही विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटलं आहे.सहा महिन्यांची मुदतवाढ ही पब्लिकेशनचे पुरावे आणि सादरीकरणाच्या दोन कॉन्फरन्स यासाठीसुद्धा लागू असेल.तसेच फेलोशिपचा कालावधी हा पाच वर्ष इतकाच असणार आहे.