• Download App
    आनंदाची गुढी : पारंपरिक शोभायात्रेने हिंदू मराठी नववर्षाचे नाशिकमध्ये भव्य स्वागतGrand welcome of Hindu Marathi New Year in Nashik with traditional procession

    आनंदाची गुढी : पारंपरिक शोभायात्रेने हिंदू मराठी नववर्षाचे नाशिकमध्ये भव्य स्वागत

    नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे पाच दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता Grand welcome of Hindu Marathi New Year in Nashik with traditional procession

    प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालीवाहन शके १९४५, शोभन संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष या मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी नाशिक मधून श्री साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणावरून बुधवार (दि. २२) मार्च रोजी नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
    या तीनही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे संपन्न झाला.

    पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली गेली. यात सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात, व मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गुढीपूजन झाले. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे, मनपा जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

    त्यानंतर पारंपरिक ढोल पथकांचे वादन सुरू झाले, शौर्य प्रात्यक्षिके, कराटे प्रात्यक्षिके, मंगळागौर खेळ, महिलांची बाईक रॅली, भजनी मंडळ, लेझीम पथक, तलवार पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब आणि मर्दानी खेळांचे पथक सहभागी झाले होते. स्वागत यात्रांना नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तसेच ठिकठिकाणी स्वागत यात्रांचे जल्ल्लोषात स्वागत झाले.

    या स्वागत यात्रांच्या नियोजनासाठी वृषाली घोलप, सुचेता भानुवंशे, प्रदीप भानुवंशे, मोहन गायधनी, प्रतिक शुक्ल, अश्विनी चंद्रात्रे, प्रियंका लोहिते, केतकी चंद्रात्रे, मंदार कावळे, केदार शिंगणे, बापू दापसे, शेखर जोशी, कौस्तुभ् अष्टपुत्रे, शिवम बेळे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, प्रसाद गर्भे यांनी विशेष मेहनत घेतली.

    १८ मार्च ते २१ मार्च दरम्यान पाडवा पटांगणवर महावादन, अंतर्नाद, महारांगोळी, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि सादरीकरण आदी कार्यक्रम संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमांना नाशिककरांनी मोठ्या उपस्थितीत दाद दिली.

    Grand welcome of Hindu Marathi New Year in Nashik with traditional procession

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!