भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. आता राज्यपाल पडळकरांच्या पत्रानंतर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.Gopichand Padalkar Letter To Governor Koshiyari For Ahilyadevi Holkar Statu in Solapur University
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. आता राज्यपाल पडळकरांच्या पत्रानंतर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा उभारण्याचे महत्त्व विशद केले आहे. ते म्हणाले की, परकीय आक्रमणाने छिन्नविछिन्न झालेल्या हिंदू संस्कृतीचा व मंदिरांचा जीर्णोद्धार माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वाला ‘पुण्यश्लोक’ संबोधलं गेलं.
माँसाहेबांची शिवपिंडधारी प्रतिमा आजही जनमानसात रुजलेली आहे. पण त्याच बरोबर माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पराक्रमी बाण्याचा पैलूही जनमानसात रुजावा. त्यामुळे त्यांच्या महान कर्तृत्वाला साजेसा पुतळाही त्याच ताकदीचा असला पाहिजे.
त्यासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आवारात उभारला जाणारा प्रस्तावित पुतळाही ‘अश्वारूढ’च असला पाहिजे. अशी सर्वसामान्य जनतेची आग्रही भावना आहे, असं पडळकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
पोस्टर बॉयकडून इथेही खोडा
पडळकर म्हणाले की, आधीच्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांनी मान्यताही दिली. पण जाईल तिथं राजकारण करण्याची खोड असलेले पोस्टर बॉय इथेही खोडा घालताहेत.
परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पवित्र नाव लाभलेल्या विद्यापीठाला आपण राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती म्हणून कुणाच्याच राजकारणाचा अड्डा होऊ देऊ नका. ही आपणास विनंती आहे. माँसाहेबांचा भव्य अश्वारूढच पुतळा उभारण्यात यावा अशा सूचना आपण विद्यापीठ प्रशासनाला द्याव्यात. अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
Gopichand Padalkar Letter To Governor Koshiyari For Ahilyadevi Holkar Statu in Solapur University
विशेष प्रतिनिधी
- ॲट्रोसिटी प्रकरण : करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी
- बेळगावात भाजपला स्पष्ट बहुमत,३६ जागा जिंकल्या; हुबळी- धारवाडमध्ये आगेकूच; कलबुर्गीमध्ये मात्र काटे की टक्कर
- वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, चित्रा वाघ यांनी सुनावले
- हवाई दलाचे विमान दोन केंद्रीय मंत्र्यांना घेऊन चक्क बारमेरजवळील राष्ट्रीय महार्गावर उतरणार… आपातकालीन लँडिंगसाठी पर्यायांच्या चाचपणीचा उद्देश