प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड नष्ट करत आहेत. याचं काकांना दुःख आहे आणि काकांच्या दुःखाचं यांना पित्त झालं आहे म्हणून महाराष्ट्र बंदचा कांगावा आहे, अशा शेलक्या शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या बंदचा समाचार घेतला.Gopichand Padalkar has once again set the government on fire
महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, असे टीकास्त्र देखील पडळकर यांनी सोडले.
लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि सर्वसामांन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार आगपखड केली आहे. तसेच संजय राऊत यांनाही राज्यातील शेतक-यांच्या परिस्थितीवरुन त्यांनी थेट सवाल केला आहे. लखीमपूर येथील घटनेबद्दल आम्हाला संपूर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे क्षमता आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
जनाब संजय राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाहीत, अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. त्यामुळे तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, अशी जोरदार टीका पडळकर यांनी यावेळी केली.
– महाराष्ट्र बंदचा देखावा का?
मूळात तुम्हाला काकांचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे, असा गंभीर आरोपही पडळकर यांनी केला आहे.
Gopichand Padalkar has once again set the government on fire
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंड निवडणूक 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का, 6 वेळा आमदार आणि परिवहन मंत्री यशपाल आर्य मुलासह काँग्रेसमध्ये सामील
- ड्रग्स प्रकरण : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब
- महाराष्ट्र बंद : मुंबईत दिसला बंदचा परिणाम, दगडफेकीच्या घटनेनंतर बेस्ट बस सेवा खंडित
- जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये चकमकीत लष्कराचे 5 जवान शहीद, चार दहशतवादी लपल्याची शक्यता
- अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे; देशमुख मात्र कुटुंबीयांसह गायब??
- धर्म आणि कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्यशिक्षण देऊन हिंदूंनी स्वतःचे धर्मांतर रोखले पाहिजे; मोहन भागवत यांचे परखड मत