प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुढे सरसावले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा दिला आहे. एवढेच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी शेतकऱ्याचा आसूड हातात घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहेराज्यातील एसटी कर्मचारी तुपाशी खायचा असेल तर “युनियन मुक्त कर्मचारी” गरजेचा असल्याचे सांगत यापुढच्या काळात ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ हा आपला नारा असल्याचे ते म्हणाले.Gopichand Padalkar appeals ST workers to quit their Unions
राज्याच्या अनेक एसटी कर्मचारी संघटना कोट्यवधी रुपये एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून घेतात. ते स्वतः तुपाशी खातात, तर एसटी कर्मचारी आणि त्याचे कुटुंब मात्र उपाशी राहते. त्यामुळे आता सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी युनियनच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन, एसटी कामगार युनियनचे फलक फेकून देण्याचे आवाहन पडळकर यांनी केले आहे.
- वडेटट्टीवारांनी महाज्योतीला यड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलीय; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोपीचंद पडळकर हे पुढे सरसावले असून, आटपाडीच्या झरे येथे गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील एसटी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सुरू असणारी लूट, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि विविध मागण्यांच्या बाबतीत चर्चा झाली.
आता आक्रमक व्हा
एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुढे येणे अपेक्षित होते. मात्र, या संघटना केवळ सभासदांकडून कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतही नीट शिक्षण घेता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना, ही आपली भूमिका आहे.
त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी पडळकर यांनी केली. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा आणि सरकार हा निर्णय घेणार नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचा आसूड घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.
Gopichand Padalkar appeals ST workers to quit their Unions
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेऊनही क्वारंटाइन करण्याचा निर्णय, युनायटेड किंगडमचा निर्णय; शशी थरूर यांचा प्रखर विरोध
- भारताचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून व्ही.आर. चौधरींची नियुक्ती, आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबरला होणार निवृत्त
- कार्ला, लोणावळा परिसरात जोरदार पावसाची हजेरी ; एकविरा गडावर मोठा आवाज करत दरड कोसळली
- गहना वशिष्ठ यांनी राज कुंद्राची तुरुंगातून सुटका झाल्याबद्दल केला आनंद व्यक्त , बोल्ड चित्र शेअर करत राज कुंद्राचे केले स्वागत