प्रतिनिधी
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा करताच गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये या दोन्ही शहरांच्या बदललेल्या नावाचा अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव असा उल्लेख केला होता. विधिमंडळ व केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नसल्याने अद्याप नामांतरावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही ‘गुगल’ने एवढी घाई का केली, असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जात होता.Google’s Uturn Sambhajinagar’s Aurangabad on the map, Dharashiv’s Osmanabad
- संभाजीनगरचा पाणीप्रश्न : भाजप ते राज्यपाल चौफेर कोंडीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना घालावे लागले लक्ष!!
काहींनी मात्र गुगलच्या या कृतीचे समर्थनही केले होते. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘गुगल’ला या कृतीबद्दल जाब विचारून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. नामांतरविरोधी कृती समितीनेही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मात्र नमते घेत गुगलने तातडीने सर्च इंजिनमधून संभाजीनगर व धाराशिवचा उल्लेख काढून टाकला.
आता दोन्ही शहरांच्या नावापुढे पूर्वीप्रमाणे औरंगाबाद व उस्मानाबाद अशीच नोंद दिसत आहे.
Google’s Uturn Sambhajinagar’s Aurangabad on the map, Dharashiv’s Osmanabad
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचा वाढदिवस : धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र फटाके फोडले, नंतर एकमेकांमध्ये भिडले!!
- केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर सुभाष देसाई देखील बंडखोरांच्या टार्गेटवर!!; 10 % कमिशनखोरीचा रमेश बोरनारेंचा आरोप
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आंदोलकांवर लष्कराची कारवाई, राष्ट्रपतींच्या सचिवालयातून जमावाला हाकलले
- ठाकरे परिवारावर टीका टाळणाऱ्या बंडखोर आमदार – खासदारांचे आता आदित्य ठाकरेंना थेट प्रत्युत्तर!!