• Download App
    अलविदा : सना खान नंतर 'रोडिज' साकिबचे ग्लॅमर जगताला 'अलविदा'! 'आता संपूर्णपणे अल्लाहला शरण' ।Goodbye: 'Roadies' after Sana Khan 'Goodbye' to Shakib's glamor world! 'Now surrender completely to Allah'

    अलविदा : सना खान नंतर ‘रोडिज’ साकिबचे ग्लॅमर जगताला ‘अलविदा’! ‘आता संपूर्णपणे अल्लाहला शरण’

    ‘माझा मार्ग चुकला होता’ म्हणत साकिब खानने मनोरंजनसृष्टीला अलविदा म्हटलं आहे.


    प्रसिद्धी मिळूनही ती मृत्यूनंतरच्या जीवनासाठी उपयोगी नसल्याचे उमगले


    इस्लाम धर्म, अल्लाह आणि कुराण यांच्यासाठी मनोरंजन विश्‍वातून बाहेर पडणार्‍या अभिनेत्याकडून हिंदु धर्मीय बोध घेतील का ?


    इस्लाम धर्माच्या मार्गावर पुढील आयुष्य व्यतित करणार


    याआधी झायरा वसीम, सना खान या अभिनेत्रींनी केलाय अलविदा


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अभिनेत्री झायरा वसिम आणि सना खान यांच्यानंतर एम टीव्ही ‘रोडिज रेव्होल्युशन’मधून प्रसिद्धी मिळवलेला रोडिज स्पर्धक आणि मॉडेल साकिब खान यानेे इस्लाम धर्मासाठी मनोरंजनसृष्टी आणि वलयांकित जगाला अलविदा म्हण्टले आहे. धर्म आणि इस्लाम यांच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. Goodbye: ‘Roadies’ after Sana Khan ‘Goodbye’ to Shakib’s glamor world! ‘Now surrender completely to Allah’



    साकीबने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्याने म्हटले आहे, ”भविष्यात मी मॉडेलिंग आणि अभिनय करणार नाही. माझ्याकडे काम नाही किंवा मी हार मानली, असे नाही. माझ्याकडे पुष्कळ चांगली कामे आहेत; पण अल्लाहची इच्छा नव्हती. फक्त काहीतरी चांगले माझ्या नशिबात अल्लाहने लिहिले असेल. इंशा अल्लाह !”

    त्याने पुढे लिहिले आहे, ”मी मुंबईत संघर्ष पाहिला आहे. इथे जगणे कठीण आहे. एका वर्षापेक्षा अल्प कालावधीतही मी चांगली प्रसिद्धी आणि चाहते मिळवले; पण ते जगासाठी आणि मृत्यूनंतरच्या जीवनासाठी काहीच नाही. मला काही कळत नव्हते आणि मी इस्लामच्या विरोधात जात होतो. मी नमाजपठण करायचो, तरी सुद्धा काहीतरी कमी जाणवत होती. ती शांतता आणि अल्लाह यांच्याविषयीचे माझे दायित्व होते. आता मी पूर्णपणे अल्लाहला शरण जात आहे. जी शांतता होती, ती आता माझ्या समोर आहे, ते म्हणजे माझं कुराण !”

    साकिब खान याने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. वकीली करत असतानाच रोडीज रेव्होल्युशन तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर त्याने स्वतःची ओळख करून देताना सांगितले की, ‘ मी काश्मिरचा असून, मी दगड फेकणारा नाही,’ अशी त्याने स्वतःची ओळख करून दिल्यानंतर त्याच्याबद्दल सर्वांचे मत वेगळे झाले होते. मुंबईतील लोकांच्या मनात काश्मिरी लोकांचे जे चित्र आहे ते बदलण्यासाठी आपण मुंबईत आल्याचेही त्याने यावेळी सांगितले होते.

    Goodbye: ‘Roadies’ after Sana Khan ‘Goodbye’ to Shakib’s glamor world! ‘Now surrender completely to Allah’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by S A K I B K H A N (@saqibkhan_64)

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!